कांचन प्रकाश संगीत की तीन रचनाएँ – पाऊस पिकलाs, तांबुस हिरव्या और मदनबाण Kavi Aur Kavita

0

पाऊस पिकलाs

पाऊस पिकलाs
आंबा  संपलाss
कुण्या एका आंब्याने
पण रोपा जपला  ।।

रोपा पहा कसा
उगवूssनी आला
बघत्याच्या नजरेला
कवतिकाचा झाला  ।।

देवाजीची करणी
जसं नारळात पाणी
आंब्यातूनी थेट आला
रोपा उसळोनीsss  ।।

तुमचे आमचे डोळे
नाही  फसलेss
आक्रितss घडलेs
तुम्हा आम्हा दिसले ।।

पुन्हापुन्हा पाही
जो तो आचंबीssतs
गुंग होती आंब्याला
नाही विसंबीssतs  ।।

तांबुस हिरव्या 

तांबुस हिरव्या मृदुल मोकळ्या
पानांतून उलगले
इथे  कोवळया अश्वत्थाचेss
भव्य स्वप्न शिलगले
हा सृष्टीचा मान साजिरा
पोर तिचे सानुले
भविष्य सुंदर विशाल त्याचे
दृष्टीला बिलगले ! …………

हिरवाईची मवाळ विद्युत
अंगांगी शिरशिरले
पुलकित जीवनस्पर्शाने
ते आपैsच मंतरले
रस्त्याकाठी पिंपळ संकुल
अलगद अंकुरले
मनात शिरले विशाल झाले
मोदाने भरले ! ………….

मदनबाण

काळजुना चिरतरूण शिल्पी
शिल्प घडवितो किती निरंतर
क्षणभंगुर जरि काही असुंदर
शिल्पे काही नितांssत सुंदर !!

कळी- पाकळी- फूल-पान- हा
मदनबाण अति घडला कोरीव
गंध खेळवीss गडद मधुरतम
शिल्प सुरंssजन दर्शन राजीव !!

बहुमुखी प्रतिभा से संपन्न कांचन प्रकाश संगीत

 हिंदी और मराठी भाषा की जानी-मानी साहित्यकार है 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *