स्वातंत्र्य लाभले आम्हाला : राहुल पिंगळे
स्वातंत्र्य
स्वातंत्र्य लाभले आम्हाला
स्मरण करितो त्या स्वातंत्र्यवीरांचे
नाही फेडू शकत उपकार
मातृभूमीसाठी रक्त सांडणा-यांचे
प्रत्येक श्वास आहे त्यांचा
रक्तातला एक एक थेंब आहे त्यांचा
आयुष्यातला प्रत्येक क्षण आहे त्यांचा
या वीरांमुळे अर्थ उमजला स्वातंत्र्याचा
वंदे मातरम
वाटतं
गर्दीतून दूर निघून जावसं वाटतं
जड झालेलं मन एकटच हलकं करावंसं वाटतं
लाखों अपेक्षांचं ओझं उतरवून
मुक्त स्वच्छंदी होऊन विहारावसं वाटतं
स्वत:च्याच प्रेमात पडावंसं वाटतं
स्वार्थी जगात स्वार्थी होऊन जगावसं वाटतं
प्रेम
प्रेम दोन अक्षरं एक शब्द
प्रेम दोन मनांचा संवाद नि:शब्द
प्रेम एक रोमांचित स्पर्श
प्रेम मनामनातला सुखद हर्ष
प्रेम एक धूंद सहवास
प्रेम भावभावनांचा प्रवास
प्रेम वेदनादायी विरह
प्रेम क्लेशकारक कलह
प्रेम एक नुसताच भास
प्रेम जीवंतपणाचा आभास
प्रेम निराशेचा सागर
प्रेम माणुसकीचा जागर
प्रेम गुंफलेला श्वासात श्वास
प्रेम एक चिरंतन विश्वास
बहुमुखी प्रतिभा से संपन्न राहुल पिंगळे
Actor, Radio Jocky तथा Dubing Artist होने के साथ-साथ
हिंदी और मराठी भाषा के सुप्रसिद्ध कवि भी हैं
Very nice written… ur choice of words and flow were both nicely done as well as structure. amazing work keep up the outstanding work…..
Aapki sabhi post out standing hai….samajh to nahi aa rahaa lekin shabd bemisaal hai….