कवि और कविता : पाऊसकाळी – कांचन प्रकाश संगीत kaanchan prakash sangeet

1

पाऊसकाळी
कधी पाखरू उदास होते
मन भिंगुळते क्वचित उसवते,
फांदीवरती ठाव मिळुनही
स्थिरावया घाबरते
श्याम धवळ तळमळते.

तेच पाखरू
आनंदुनि मग सुहास होते
पाऊसकाळी कुणामुळे मन गुलाब होते,
तेच फूल अन् पान देठही
तेच नाचरे पाय ठेवुनी
फांदीवर गाभुळते.

घन भरले काळे उदास नभ
कधि स्वच्छ मोकळे
तसे मनाचे सान पाखरू
घनघेरुन कधि मुक्त कोवळे !

कांचन प्रकाश संगीत

 साहित्य – संगीत और कला जगत का जाना पहचाना नाम है 

1 thought on “कवि और कविता : पाऊसकाळी – कांचन प्रकाश संगीत kaanchan prakash sangeet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *