Skip to content
कान्हुला
श्रीरंग तान्हुल्याचे कौतुक किती करू मी
वाटे लहानग्याला आता उरी धरू मी ।
पावा हातात चिमणा लडिवाळ धून वाजे
वृक्षातळी विशाल कान्हा सुखे विराजे ।
अन् ऊन्ह सावल्यांनी नटले सुदूर डोंगर
मृदु सावळ्या तनूवर साजे जसा पितांबर ।
शिरि शोभते चिमुकले हळुवार मोरपिसs
नकळे उन्हे उगवती की उतरे हळूच दिसs ।
स्वर गोड बासरीचे ss वेढून चित्त घेतीss
हे दृष्य वेड लावी ss घ्या अंतरी प्रभातीs ।।
बहुमुखी प्रतिभा से संपन्न कांचन प्रकाश संगीत
हिंदी और मराठी भाषा की जानी मानी साहित्यकार हैं।