Kavi Aur Kavita : कांचन प्रकाश संगीत की दो रचनाएँ
या फुलांच्या रूपरश्मी
या फुलांच्या रूपरश्मी
स्पर्शिती मनमोकळ्याला
परकेपणा नाही मिसळला…….
या फुलांच्या रंगऊर्मी
वर्ख राजस आणि थोडा
संन्यासही आहे मिसळला……..
या फुलांच्या गंधकोषी
जीवनाचा स्पर्श ओला
गंध जरि नाही मिसळला……..
या फुलांच्या भावगर्भी
विश्वास श्वासांचा सुरेला
गोडवा आहे मिसळला………
कडे कपारी
कडे कपारी दगड खिळपटी जीवन तगते !
कसे जळाविन बीज सानुले सहज उलगते !
लाल पालवी पंख पसरुनी
मन ऊंचावुन आभाळ बघते,
आभाळातल्या ग्रह – तार्यांना
उभे राहुनीss सलाम करते,
डोळाभर ते कौतुक त्याचे ss
मनात भरते, उरात शिरते ;
तिथे अडाण्या अनवट जागी
माझ्यामधले जीवन जगतेsss…………….
कांचन प्रकाश संगीत
साहित्य – संगीत और कला जगत का जाना पहचाना नाम है